- ajaybansod8378@gmail.com
- (+91)9673067820
- (+91)7385499734
माणसाच्या हृद्याचे ठोके वाढविण्यासाठी “तुमची गुंतवणूक” सुरक्षित तर आहे ना असे वाक्य खूप काहीतरी सांगून जाते. कारण त्याने बहुदा गुंतवणूक करताना फक्त विश्वास या एकाएकी माहितीच्या आधारे केलेली असते. आता चलन बदलाचा जो काही निर्णय झाला त्यात सरकारला असे वाटते कि सहकारी बँका आणि पतसंस्था येथे पैसे देवाणघेवाणीत अफरातफर होऊ शकते. सरकारला त्याच्यावर काडीचा विश्वास नाही. या पतसंस्था आणि सहकारी बँकांनी सरकारला नानाविविध प्रकारे पटविण्याचा प्रयत्न केला.पण जिथे विश्वास नाही तिकडे जातीचा व्यापारी असणारा पंतप्रधान जाईल हो कसा?आणि काही व्यापारी मात्र दैनंदिन भरणा आणि मोठे व्यवहार या बँकातून करताय , आतातरी जागे व्हा , आज पर्यंतचा इतिहास बघा जेवढ्या पतसंस्था किंवा पतपेढ्या बंद झाल्या त्यांनी तुमचे किती नुकसान केले आहे.
आता प्रश्न असा पडला असेल कि मग यांशिवाय दैनंदिन भरणा दारात घ्यायला कोण येणार ? अनेक नवीन व्यवसाय बाजारात आहेत जे रोज भरणा घेतात . उदा: दैनंदिन सरकारमान्य लिलाव भिशी हेही रोज भरणा घेऊन रोज पैसे (भांडवल) देतात . इथे तर विश्वासाचा प्रश्नच येत नाही . रोज लिलाव असल्याने या कंपन्यांना रोज भांडवल वाटावे लागते. शिवाय कायदेशीर संरक्षण आहे. विना तारण , विना जमीनदार तेथे पैसा मिळतो.यापुढे पतसंस्थेच्या किंवा सहकारी बँका यांचे भवितव्य डळमळीत आहे असे वाटते . वेळीच मार्ग बदलणे हे यशाचे कारण असते .जगात जेवढे प्रश्न निर्माण होतात ते आंधळेपनामुळे होतात . सर्वच मध्यम वर्गीय वैयतिक पातळीवरचे प्रश्न सोडविण्यासाठी जातो.आयुष्यातील आर्थिक स्वाथाचा गहन प्रश्न नियती सोडवत नाही. आणि मग कशाची निवड करावी नि कशाची करू नये यात संभ्रम निर्माण होतो . मग समाज ज्या दिशेने जातो तीच दिशा योग्य अशी समज करून बरीच मंडळी त्याच दिशेने जाण्याचा निर्णय घेतात , काही मंडळी अतिविचार करतात , अति विचार म्हणजे योग्य कृती असे नाही. योग्य विचार ,सद विवेक बुद्धीचा वापर करून,मार्ग निवडणे कधीही योग्य.अनेकदा अनेक निर्णय हे गोंधळलेल्या अवस्थेत घेतले जातात ,स्वताला शहाणे समजणाऱ्या माणसांची ह्या जगात एवढी गर्दी झालेली आहे कि कधी कधी तुम्हालाही शहान ठरायच असेल तर शहाण्यांनी मान्य केलेले वेडेपण स्वीकाराव लागतय .परंतु तुम्हाला जर जगा वेगळ करायचं असेल तर स्वताचा वेगळा मार्ग निवडावा लागेल .स्वताची वेगळी वाट शोधायला हवी. हि वेगळी वाट शोधण्यात यशस्वी होण्यासाठी निरंतर प्रयत्न , नो शोट्कट ,धृढ विश्वास यांची सोबत घ्यावी लागणार आहे. परंपरांनी जखडलेला समाज प्रथम करेलच विरोध ,आणि जर तुम्ही सातत्याने वेडे होऊन तुमच्या कामावर श्रद्धा ठेऊन लोक काय म्हणताय या कडे संपूर्णपणे दुर्लक्ष कराल तर तुम्हाला यश हे नक्कीच मिळणार आहे .प्रवासाला बाहेर पडलेला व्यक्ती धोके स्वीकारतो, कुंपणातून बाहेर पडतो म्हणून तो पोहोचतो , आणि पोहचायचं असेल तर किनारयावर उभे राहून कसे चालेल?परिवर्तन करायचे असेल तर एक क्षण हि पुरेसा असतो.
खाजगी भिशी – सुमारे १८०० व्या शतकापासुन “राजा राम वर्मा “यांच्या काळापासून म्हणजेच १००० वर्षांपासून भारतात परंपरागत भिशी पद्धती अस्तित्वात आली .त्यात सुधारणा होत होत मग चिट्ठी पद्धती त्यानंतर लिलाव भिशी असे प्रकार येऊ लागले. याचे प्रस्थ एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढल कि गल्ली पासून दिल्ली पर्यंत प्रत्येक गावात हे लोन पसरले. परंतु जेवढी किफायतशीर ,तेवढी धोके देणारी हि पद्धती नंतरच्या काळात ठरू लागली. कारण खाजगी भिशी हि “विश्वास” या एका आधारस्तंभावर अवलंबून असते ,. सभासदांनी रक्कम परत न करणे , कागदोपत्री कोणताही व्यवहार नसणे ,विश्वास घाताचा वाढता प्रकार ,चालक रक्कम न देऊ शकल्याने व्यवहार पूर्ण न होणे, अपघाती सभासदाला कोणी वारस नाही, किंवा विमा नाही यामुळे या खाजगी भिशीत फसवणुकीचे वाढते प्रमाण, गुन्हे हे सरकार दरबारी मोठ्या प्रमाणात येऊ लागल्याने शेवटी यावर पर्याय म्हणून कायदेशीर पद्धतीने चालविल्या जाणाऱ्या भिशीचा उदय झाला.
कायदेशीर भिशीत्याचा प्रमुख उद्देश भिशिच्या सभासदांना तसेच चालकाला संरक्षण देणे हा आहे.
१) भिशी म्हणजे काय –
“ काही लोकांचा समूह एक ठराविक रक्कम ठराविक महिन्यांसाठी कोणत्याही लेखी व्यवहारा शिवाय फक्त विश्वासाचा आधार घेऊन त्या समूहातील एक सभासदाला गोळा केलेली रक्कम वापरण्यासाठी देतात .त्याला भिशी म्हणतात .” काही ठिकाणी भिशी पद्धतीला हराशी असेही म्हंटले जाते. यात अनेक पद्धती आहेत
अ) चिठ्ठी पद्धती -
चिठ्ठी पद्धतीतली जमा झालेली सभासदांची रक्कम त्याच गटातील सर्व सभासद्च्या नावाच्या चिट्ठी टाकून त्यातील एक चिट्ठी निवडून लकी ड्रो सारख्या प्रकाराने नाव जाहीर करून ती रक्कम त्या सभासदाला देऊन टाकतात
ब ) लिलाव पद्धत –
सर्व सभादानी जमा केलेल्या एकूण रकमेचा लिलाव बोली पद्धतीने केला जातो ज्याची बोली अधिक तो दावेदार आसतो रकमेचा.बोली जितक्या रकमेची घेतली तेवढी रक्कम एकूण जमा रकमेतून वजा करून उरलेली रक्कम दावेदारास दिली जाते .उरलेली नफा रक्कम सभासदांमध्ये समान वाटप करून दिली जाते त्याला डीव्हीडट म्हणतात.
क )पोट भिशी -
यात उरलेली नफा रक्कम सभासदांमध्ये समान वाटप करून न देता ,येणारा नफा हा परत एकाच सभासदाला देतात वापरण्यासाठी .काही ठिकाणी भिशी पद्धतीला हराशी असेही म्हंटले जाते.
२) खाजगी भिशी पद्धतीचे फायदे ? /त्याकडे लोकांचे वाढते आकर्षण ?
फक्त ओळखीच्या व विश्वासातील लोकांना सभासद बनविले जाते. सर्व व्यवहार हे रोख असल्याने कर नाही. मिळणारी रक्कम हि रोख स्वरुपात. कोणतेही लेखी कागदोपत्री हमी नाही. भांडवलासाठी जमीनदार नाही तारण नाही .लिलाव असल्याने बोली वाढवून अधिक परतावा मिळविता येतो. एक वेळी कितीही ठिकाणी सभासद होता येते . कितीही ठिकाणी भिशी घेता येते.कुठे खर्च केला याचा तपशील सरकारला किंवा सभासदाला द्यावा लागत नाही.
३) खाजगी भिशी पद्धतीचे तोटे ?
गरजू मित्राला आर्थिक सहाय्य करावे, पैसे परत करायची वेळ आली कि तोंड चुकवू लागतो मग संघर्ष जिवलग मित्रांशी कायमचे वैर पत्करावे लागते . व्यवहाराचा नियम सांगतो मित्रा मित्रा मध्ये धनको आणि ऋणको बनू नये .परंतु हा नियम खाजगी भिशीत धाब्यावर बसवला जातो .अशावेळी या व्यवहारात पैसे आणि मित्र दोन्ही गमवावे लागतात .केवळ कटुता आणि पश्याताप कपाळी येतो .
सहजपने विश्वास घात करता येतो, कारण लेखी हमि नाही. जरी सभासदानी कायदेशीर रीत्या जाण्याचा प्रयत्न केला तरी वाव नाही .कोणतेही संरक्षण नाही. एखादा सभासद मरण पावला तर विमा नाही. पैसे परत मिळतील याची कोणतीही शाश्वती नाही. जर कोणीही तक्रार केली भिशी चालकाविरुद्ध तर कायद्याने मनी लॉन्ड्रिंग चा गुन्हा दाखल होतो. तसेच सावकारी परवाना नाही म्हणून गुन्हा होतो.
४) सरकारमान्य लिलाव भिशी चा उदय
१०२ वर्षांपूर्वी १९१४ साली केरळ राज्यातील त्रावणकोर या ठिकाणी पहिली सरकारमान्य लिलाव भिशीचा उदय झाला . यात भिशीला कायदेशीर स्वरूप देण्यात आले . सभासदांचे व भिशी चालकाचे हित जोपासण्यात आले. सर्व व्यवहार हे कागदोपत्री करण्यात आले. नंतर भारतातील जवळजवळ सर्व राज्यांनी कायदेशीर भिशीचा अवलंब सुरू केला. राज्यनिहाय वेगवेगळे कायदे करण्यात आले . परंतु आता २०१२ पासून १९८२ च्या कायद्याला केंद्रीय कायदा म्हणून घोषित केले . सद्याच्या आकडेवारीनुसार १०००० पेक्षा अधिक पंजीकृत कंपनी कार्यरत आहेत.
५)मिडिया आणि भिशी कंपनी
लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ निरपेक्ष , निर्भीड ,निष्पक्ष आणि सत्य बाजू लोकांसमोर आणणारा मिडिया होय. मग तो दृश , दृकश्राव्य कसाही असला तरी याची जादू एवढी प्रभावशाली आहे कि जसा एखादा जादुगार हातातला रुपया गायब करतो किंवा डबल करतो तेव्हां खरतर जादुगार असे काही करू शकत नाही हे माहिती असूनही आपले डोळे दिपून जातात आणि आपण त्यावर विश्वास ठेवतो .हेच काम मिडिया करते आहे जे आम्ही सांगू ते खरे वाटेपर्यंत डोक्यात घालायचे “ये अफवा थी कि मेरी तबियत खराब है, मिडीयाने बताबताके बिमारही कर दिया ”मिडिया एवढे प्रभावशाली माध्यम कोणतेही नाही . म्हणूनच ते चांगल्या आणि वाईट ह्या दोन्ही बाबतीत सारखेच काम करतो. सद्दयाच्या स्थितीत टी आर पी साठी कोणत्याही बातमीच्या तळाशी न जाता उथळ पने फक्त लोकांमध्ये गोंधळ निर्माण करणे व तो तसाच ठेवणे. मिडीयाने सर्वाधिक आर्थिक फसवनुकीना चीट फंड म्हणून बदमान केले आहे. मिडीयाने दाखवलेल्या बातमीत सत्य हा भाग किती गौण ठरतो .चीट फंड च्या नावाने जो काही भ्रम लोकांमध्ये निर्माण झालेला आहे, तो ९०% मिडीयाच्या कृपाशीर्वादाने आहे. त्यामुळे झालेले नुकसान कधीही भरून येणार नाही .''chit'' फंड आणि ” cheat” यातील फरक तसा फार मोठा आहे शब्द आणि शब्दाच्या अर्थात गुरफटून मिडीयाने शाब्दिक खेळ केलाआहे .शब्दाने शब्द जोडला तर कविता होते आणि शब्दाने शब्द वाढला कि भांडण होते,म्हणून या शब्दांच्या गुंतागुंतीत जाण्यापेक्षा त्याच्या उत्पत्ती आणि अर्थ पाहू
६)“चीट” या खरा अर्थ- sell म्हणजे विक्री? कि sell म्हणजे मोबाईल ?sell म्हणजे जेल? कि sell म्हणजे मासपेशी ? sell म्हणजे डिस्काउंट ?
हे जस आहे ना एकच शब्दाचे अनेक अर्थ .एखाद्या शब्दाचा जसा एक सांकेतिक अर्थ आपल्या मनात उराशी बाळगलेला असतो आपण त्याची स्पेलीग पाहण्याची हि तसदी घेत नाही. अगदी असच झाल ‘चीट” या शब्दाशी .आणि या मुळे अनेक लोक येथे येणे डायरेक्ट नाकारतात . त्याच्या मुळा पर्यंत न पोहचता . परंतु “HONEY IS HIDDEN WHITIN THE FLOWER BUT ONLY THE BEE KNOWS IT” .आता चीट हा उदगार आहे आणि त्याचा अर्थ विचारातील विरोधाभास बघा .चीट याचे दोन अर्थ आहे पहिला म्हणजे कागदाचा तुकडा दुसरा म्हणजे “ प्रोमेसरी नोट” म्हणजे “वचन नामा” . परंतु त्याचा अर्थ cheat म्हणजे फसवणूक असा घेतला जातो. अशावेळी खरच आठवते ते विधान “नावात काय आहे”परंतु जेंव्हा या क्षेत्रात काम करायचे ठरले त्यावेळी हे विधान एकदम पांढरे फटाक पडल्यासारखे वाटते.नि वाटायला लागते कि नावातच खुप काही आहे. स्वताचा फोटो काढायला वेळ लागत नाही परंतु इमेज बनवायला खूप काळ लागतो.
७)गुंतवणूक -
रात्री आपण उशिरा आलो आणि लक्षात आल कुलुपाची किल्ली हरवली आहे तर कुलूप कितीही महागाच असल तरी ते तोडावच लागत अशा वेळी कुलुपाला किंमत देऊन घराबाहेर राहण हा निर्णय जसा चुकीचा अगदी तसाच निर्णय गुंतवणूक करताना घ्यावा .नाहीतर शोर्ट कट शोधतो आणि शॉक बसून घेतो. बहुदा लोक जमीन ,सोने, घर, शेती, बँका , शेअर्स , म्युच्युअल फंड ,आणि डीपोझीट याठिकाणी गुंतवणूक करतात . परंतु याठिकाणी केलेल्या गुंतवणुकीचे फायदे हे गुंतवणूक केल्यापासून काही वर्षानंतर मिळतात म्हणजेच आपण दिलेली रक्कम हि काही मोठ्या कालावधीसाठी विसरून जावी लागते. किंवा धोक्यात टाकावी लागते . अनेक लोक जिकडे समूहाने लोक जात आहेत तिकडे जातात कारण त्यांना वाटते समूहाने घेतलेला निर्णय हा योग्यच असेल..गुंतवणुकीपूर्वी लोक माहिती जाणून अभ्यासून न घेता फक्त एकीव माहितिच्या आधारे गुंतवणूक करतात. किंवा एखादा मध्यस्थी एजंटवर अवलबून राहतात .हे एजंट नेहमी जवळचे लोक असतात ते स्वप्न दाखवतात ,यात आपण इतके प्रभावित होतो कि स्वतःची भूमिका काय हे तपासायचच विसरतो .बहुदा गुंतवणूक करताना फसवणूक होण्याचे जास्त धोके संभवतात .गुंतवणूक आणि खाजगी भिशी या दोन्ही मध्ये विश्वास हा एकच आधारस्तंभ आहे.
८)विश्वास म्हणजे नेमके काय ?
विश्वास हा या सृष्टीवर सर्वाधिक वेळेला जन्माला येणारा आणि सर्वाधिक वेळेला मरणारा शब्द आहे.विश्वास हा कधीही एकटा येत नाही त्याचा जुळा भाऊ नेहमी सोबत असतो .त्याला “अविश्वास” म्हणतात . विश्वास हा आंधळ्या माणसाच्या हातात दिवा दिल्या सारखा असतो. नेहमी त्याला भीतीने आणि शंकांनी गुरफटून टाकलेले असते .विश्वासघात हा नेहमी जवळच्या निकट वर्तीयांकडून होत असतो .उदा: अनेकांनी याचा प्रत्यय घेऊनही पुन्हा पुन्हा गांधारीसारख्या डोळ्याला पट्ट्या बांधून स्वताची फसवणूक करवून घेतलेली आहे.अनोळखी माणसाने जर आपल्या खिशातील नोट चोरली तर त्याला चोर म्हणतात आणि आपल्यास्वतः च्या मुलाने चोरली तर त्याला विश्वासघात .अनेकदा विश्वासघात होऊनही लोक पुन्हा पुन्हा याचे बळी पडतात आणि प्रत्येक वेळी ते फसवणुकीसाठी दुसर्याला जबाबदार ठरवतात.हे अगदी अस आहे कि सिगारेट ,दारू ह्यांसारखी व्यसन त्याच्या पासून होणार्या धोक्याच्या सूचना वाचूनही डोळ्यावर पट्टी बांधून स्वीकारतो आणि या व्यसनांपायी कॅन्सर वगैरे होणारी माणस आपण नाही दुसरे कुणी तरी असे मानतो परंतु तस काही झाल तर खापर सरकारच्या किंवा वाईट संगतीचा परिनामावर म्हणून फोडतो. वारंवार फसनारा- योग्य विचार करून केलेली कृती म्हणजे यशाकडे जाण्याची पहिली पायरी हे मान्यच करत नाही.
९)लिलाव म्हणजे काय ?
एखादी वस्तू इच्छुक अनेक जणांना घ्यावयाची असेल तर त्या वस्तूची योग्य किंमत व योग्य दाम विना तक्रार सर्वांसमोर जाहीररीत्या तोलमोल करणारी प्रक्रिया म्हणजे लिलाव होय . भिशी पद्धती यावर चालते. थोडक्यात १०००० /-रुपये भरणारा २० लोकांचा २० महिन्याचा गट असेल आणि या गटातील ५ सभासद भिशीची रक्कम घेऊ इच्छिता तर नियमाने ती एकच सभासदाला देणे आहे. यासाठी त्या १००००० /-रुपयांचा लिलाव केला जातो. म्हणजेच १००००० /- आता एक वस्तू असते . जो अधिकाधिक किमतीमध्ये हि वस्तू घेण्यासाठी बोली बोलेल त्याला बोलीची रक्कम एकूण रकमेतून (१०००००/-) वजा करून देण्याची पद्धत म्हणजे लिलाव.
१०) बिल गेट्स रीपोर्ट
आय एफ यम आर (I.F.M.R)हि चेन्नई येथील संस्था “FINANCIAL MANGAGEMENT AND RESEARCH” 1970 या वर्षी स्थापन झालेली आहे.या संस्थेला “ICICI “ “THE HOUSE OF KOTHARIS”आणि काही मोठे गट प्रायोजित करतात. या संस्था चे सभासद हे अमेरिका भारतातील चांगल्या विद्यापीठातून P.HD.केलेले असतात. ४० एकर मध्ये पसरलेली आहे.भिशिच्या या रिपोर्ट ला बिल गेट्स आणि मिलिंडा गेट्स फौंडेशन ने आर्थिक सहकार्य केले आहे.
११) अल्पबचत आणि व्यापारीकरण
दुकानदार हा व्यवसाय सुरुकेल्यापासून दररोज काहीना काही रक्कम हि मोठ्या भांडवलाच्या रूपाने वापरायला मिळावी या उद्देशाने अल्पबचत खात्यात जमा करतो . त्यामध्ये बचत मिळवणे , भांडवल मिळवणे , क्रेडीट मिळवणे,कर्ज मिळवणे हा उद्देश असतो. परंतु यापेकी एकही उदेश अल्पबचत करून घेणाऱ्या बँका पूर्ण करत नाही किंवा खूप किचकट पध्दतिने पार करते.
या बँका व्यापारयाला पहिले ६ महिने कोणतेही भांडवल किंवा कर्ज देत नाही. ६ महिने दैनदिन भरणा करणाऱ्या व्यापार्याला कर्ज मिळवण्यासाठी जमीनदार किंवा तारण द्यावे लागते .
६ महीन्याच्या आत भरणा झालेली रक्कम काढावयाची असेल तर भरणा रकमेतून ५टक्के रक्कम कापून उरलेली रक्कम व्यापार्याला दिली जाते .म्हणजे ६ महिने व्यापार्याचे पैसे बँक वापरते आणि त्याबदल्यात त्याला व्याज देण्या एवजी व्याज कापून घेते. तरीही व्यापारी या ठिकाणी दैनंदिन भरणा करतो कारण त्याचाकडे पर्यायी मार्ग नाही . मग याहून सोपा मार्ग म्हणून व्यापारी खाजगी भिशीकडे वळतो आणि गुन्हेगारी मार्गाने पैसे मिळविण्याच्या पहिल्या पायरीकडे वळतो.
१२)व्यापारी आणि भिशी
भिशीतील सर्वात महत्वाचा घटक म्हणजे त्यात असा सभासद घ्यायला हवा जो दैनदिन रक्कम भरू शकेन ,आणि त्यातील सभासद हा त्या पैशांचा योग्य विनियोग करून ते परत भरणा करू शकतील .तसेच त्यातील सभासद हे गरजू आणि बचतीची हि मागणी करणारे असावे.काहीना भांडवल मिळवणे आणि काहीना परतावा मिळवणे हा उदिष्ट असणारा असावा.आणि अशी सभासद म्हणजे व्यापारी होय .भारतातील ९२ टक्के व्यापारी हे भिशीवर आपला व्यवसाय चालवतात . म्हणजेच भिशी या मार्गातून भांडवल मिळवितात.
१३) तरुणाची खरी गरज
भारत हा जगातील सर्वात तरुण देश आहे. २०२० मध्ये भारतीयांचे सरासरी वय २९ असेल. या तरुणाची ताकद राष्ट्र उभारणीसाठी सकारात्मक कार्यात वापरायला हवी . स्वच्छ भारत कौशल्य विकास , स्टार्ट अप इंडिया .यासारखे अनेक कार्यक्रम सरकार राबवत आहे.तरुणानी त्यात सहभागी व्हावे इतरांना हि प्रवृत्त करावे आणि राष्ट्र उभारणीत यावे अशी अपेक्षा सरकारची असली तरी आपला तरुण रस्त्याने एखादा खड्डे घेणारा मशीन आला हे पाहत दिवस घालवतो यावरून तरुणानाची परिस्तिथी काय हे लक्षात येते.मोर्चे किंवा रस्ता रोको मध्ये हा तरुण एवढ्या मोठ्या प्रमाणात का सहभागी होतो ? त्याला आरक्षण का हवे आहे ? आपल तरुण कष्टांना घाबरतो कि काय ? याचे उत्तर त्याला स्वतः ला हि गवसलेले नाही . खरेतर या तरुणाला हवे आहे “भांडवल” कमी दरात, सोप्या मार्गे . भांडवल जर त्याला मिळाले तर हा तरुण भारताची जगाला बाजारपेठ करून दाखवेन हि क्षमता ठेवणारा आहे. अशी काहीतरी योजना हवी ज्यात या तरुणाला या व्यवसायात उतरता येईल.
१४) दैनदिन भिशी
नवा जोश.. नवी क्रांती... नवी दिशा..आजपर्यंत आपण त्या लोकांना आपला आयडॉल मानले ज्यांनी कठीण आणि विपरीत परिस्थितीत हि आपली ध्येय सोडली नाही, सर्व विरोधाला एकट्याने सामोरे जाऊन जगाला आपली बाजू कशी बरोबर आहे हे सिद्ध करून दिले. त्यांनी काय शोध लावले का ? शोध म्हणजे काय उत्पत्ती नसते आपल्याच आजूबाजूला परंतु सामन्यांना न दिसणारी एखादी गोष्ट जगासमोर ठाम पणे मांडणे म्हणजे शोध. उदा: गुरुत्वाकर्षण चा शोध म्हणजे काय उत्पत्ती आहे का ? नाही ते शोध लागण्यापूर्वीही होते फक्त त्याची चिकित्सा केली त्याने आणि तो शोध झाला. त्यांनी वेगळे काही नाही केले तर वेगळ्या दृष्टीकोनातून केले. “नजर का ऑपरेशन हो सकता है नाज्ररीये का नही” एकदा का तुम्ही दृष्टीकोन बदलला तुम्ही काहीतरी वेगळे रचणारे ब्रम्हदेव झालाच म्हणून समजा. अगदी तसाच दैनंदिन भिशी हि एक चिकित्सेतून निर्माण झालेला शोध आहे जो या देशात क्रांती घडवू शकतो.
पैसा हा रोख स्वरुपात आणि लेखी स्वरुपात आपण वापरतो. याचे कमविण्याचे मार्ग कायदेशीर आणि बेकायदेशीर आहेत . कायदेशीर मार्गाने कमावलेला पैशावर आपणास सरकार कर लावते. ज्या पैशांवरील कर चुकविण्याचा प्रयत्न केला जातो त्याला काळा पैसा असे म्हणतात .या पैशाला मार्गी लावण्यासाठी सध्या सरकारने नोट बंदी केली. याने काळा पैसा तर मार्गी लागला काही प्रमाणात परंतु अजून गुन्हेगारी पैशाला आळा बसने शक्य झाले नाही. या गुन्हेगारी पैशात अनेक माध्यम आहेत त्यातील एक सर्वात मोठे आणि सर्रासपणे सर्वसामान्यांपासून उच्चभ्रू लोकांनी आपले हात गुंतवले आहेत ,एक मोठी सोय लोकांनी केलेली आहे ज्यात सरकारला पैसा आलेलाही कळत नाही कारण त्याचा उल्लेख कुठेच येत नाही . असे एक मध्यम आहे ज्यात भारतात २५० लाख कोटी रुपये दर वर्षी हस्तांतरित होतात. ते माध्यम म्हणजे “भिशी”आणि या व्यवसायातच क्रांती घडविण्याची ताकद आहे.
दैनंदिन भिशीचा गट - २५० रुपये x ४०० सभासद = १,००,००० म्हणजेच २५० रुपये रोज भरणा करू शकतील असे ४०० सभासद एकत्र करून रोज १,००,००० रुपये गोळा करणे. दैनंदिन भिशीचा लिलाव – मासिक भिशीचा लिलाव जसा महिन्यातून एकदा होतो त्यापद्धतीने दैनंदिन लिलाव भिशीत दररोज लिलाव होतो.
१५) दैनदिन भिशीची वैशिष्ट
दैनंदिन भिशी यातील एकूण वैशिष्ट चा सखोल अभ्यास करणे म्हणजेच आपल्या या व्यवसायात ग्राहक आकर्षित का होणार याचे विवेचन आहे.
१) १९८२च्या कायद्यानुसार चालविली जाते
आपली लोकशाही हि न्यायव्यवस्था वर चालते आणि त्याचा मूळ आधार आहे कायदे. आपण सर्व लोक कायद्याने व्यवहार करण्यावरच अधिकाधिक भर देतो जेणेकरून आपणास अधिकाधिक सुरक्षितता मिळते. व त्या व्यवहाराला महत्व प्राप्त होते . दैनदिन लिलाव भिशीसाठी सुधा १९८२च्या कायद्यानुसार चालते. यात प्रत्येक सभासदाची प्रत्येक गटाची नोंद हि सरकारकडे असते. तसेचजेवढे गट सुरु आहेत त्यांची एकूण रकमे इतकी राशी सरकारकडे सुरक्षित ठेव म्हणून ठेवलेली असते. तसेच प्रत्येक सभासदाला बीड ऑफर फॉर्म द्वारे लिलावात नुसती सही करून सहभागी होता येते. प्रत्यक्ष हजर राहण्याची गरज नाही. कायद्याने सभासद आणि कंपनी यात जो कायदेशीर करारनामा झालेला आहे त्याच्या प्रती सभासदाला आणि या भिशीवर नियंत्रण ठेवणाऱ्या रजिस्टर यांनाही दिलेले असते. त्यातून दोघांनाही एकमेकांवर गुन्हा नोंदविता येतो किंवा कायदेशीर कार्यवाही करता येते.
२)कोणत्याही प्रकारची गुंतवणूक नाही
सर्वसामान्यांपासून तर अति श्रीमंत असणाऱ्या प्रत्येकाला पैशांसंदार्भातली गुंतवणूक करायची असेल तर पडणारे २ प्रश्न म्हणजे मी केलेल्या गुंतवणुकीला सुरक्षितता काय? आणि दुसरा म्हणजे जर सुरक्षितता असेल तर माझ्या गुंतवणुकीतून मला परतावा काय मिळणार आहे? जर या दोन्ही प्रश्नांची उत्तरे समाधान कारक असतील तर सभासद मिळविणे अतिशय सोपे असते. परंतु या जगात आई चे प्रेम, उगवणारा सुर्यनारायण आणि मृत्यू या शिवाय शाश्वत चोथी गोष्ट नाही . तर मग खात्री कशी देणार. कि १०० टक्के सुरक्षितता . आजपर्यंत ज्या लोकांनी पैसा बुडविला त्यांनी पैसा घेण्यापूर्वी खरी खात्री दिलीच असेल ना मग तरीही असे का घडते कारण खात्री नाही तर त्यांनी तुमचा विश्वास घेऊन विश्वास घात केलेला असतो आणि मग गुंतवणूक न करता काही बचत मिलेले का हे आपण नेहमी शोधतो. तो शोध संपतो सरकारमान्य दैनंदिन लिलाव भिशी जवळ. कारण याठिकाणी दैनंदिन पैसा गोळा करून दैनंदिन त्याचा लिलाव करून गोळा केलेला पैसा दैनंदिन एका सभासदाला देणे क्रमप्राप्त असते. कोणीही सभासद मोठी रक्कम गुंतवत नाही. उलट भांडवल मिळविण्यासाठी रोज अल्प भरणा करून आपल्यातील एका सभासदाला विना तारण विना जमीनदार कर्ज मिळवून देतो.
३)लिलाव कॅमेरा समोर
१९८२ च्या कायद्याने प्रत्येक सभासदाला लिलावात पाहिजे त्या टक्केवारीने सहभागी होता येते.त्याचा भरणा जर अखंडित असेल तर तो लीलावत सहभागी होण्यासाठी पात्र आसतो. लिलावाचा कालावधी हा गट सुरु होण्यापूर्वीच सर्व सभासदांना कळविला जात असल्याने. त्याचा वार व दिनांक हि कायम केलेली असते., लिलाव हा ५ मिनिटांचा असतो. लिलावात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष दोन्ही प्रकारे सहभागी होता येते. परंतु सभासदांची संख्या अधिक असल्याने तसेच लिलाव हा पारदर्शक होण्यासाठी लिलाव कॅमेरा समोर घेऊन त्याचे लाइव्ह प्रक्षेपण सभासदांना त्याच्या भ्रमणध्वनी वर पाहायला मिळते.
४)घरपोहोच भरणा
सभासंकडून दैनंदिन भरणा स्वीकारण्यासाठी कंपनीचे अधिकृत अधिकारी सभासदाने ठरवून दिलेल्या जागेवर येतात. सभासदाला भरणा करण्यासाठी दुकानाबाहेर जाण्याची गरज नाही .
५)पासबुक
अधिकृत भरणा अधिकारी सभासदाने दिलेल्या रकमेची नोंद ठेवण्यासाठी व रक्कम ताळेबंद होण्यासाठी आणि ग्राहकाला त्याने केलेला भरणा किती झाला हे समजण्यासाठी बँके प्रमाणे पासबुक दिले जाते. यावर भिशीचे काही महत्त्वाचे नियम व अटी यांचा उल्लेख असतो. ज्या योजनेत सभासद सहभागी आहे त्या योजनेची लेखी माहिती असते. सभासदाला भिशीतील रक्कम मिळविण्यापूर्वी कोणती कागदपत्रे लागणार आहेत याचाही उल्लेख सभासदाचा गट क्रमांक, टोकन क्रमांक, भिशी सुरु केलेली दिनांक , भिशीचा कालावधी कधी संपणार आहे ती दिनांक ,पासबुक क्रमांक हे देखील असते. महत्वाची बाब म्हणजे हे पासबुक सभासदाकडेच असते. त्यातील नोंदी या सभादासाठी असतात. पावती आणि पासबुक यांचा ताळमेळ न बसल्यास पावती तील रक्कम हि ग्राह्य धरली जाते . पासबुक मधील रक्कम हि कंपनीत भरलेल्या रकमेपेक्षा वेगळी असू शकते.
६)पावती
अधिकृत अधिकारी जरी पासबुक देत असले आणि त्याची नोंद करून देत असले तरी अधिकृत पावतीशिवाय सभासदाने दिलेली रक्कम हि जमा रकमेत ग्राह्य धरली जाणार नाही . म्हणून सभासदाने पावती शिवाय रक्कम देऊ नये . अधिकृत पावती हा आपला कंपनीत जमा झालेल्या रकमेचा पुरावा असतो. पावतीशिवाय व घेतली जाणारी रक्कमे ची जबाबदारी कंपनी घेत नाहि. ती सर्वस्वी जबादारी हि सभासदाची असते.
७)कॅशलेस सुविधा
सद्याचा बदलत्या देशातील व्यवहाराचा संकेत हा आहे कि सर्व व्यवहार हे कायदेशीर व विश्वासपात्र होण्यासाठी कॅशलेस होणे गरजेचे आहे,. खाजगी भिशी हि रोख स्वरुपात असते तर. त्यामुळेच टी धोकादायक आहे. म्हणून सरकारमान्य भिशीत आपण आपला भरणा हा धनादेश , डेबिट कार्ड , क्रेडीट कार्ड, डी.डी.,आर टी जी स, याद्वारे करून निश्चिंत राहू शकता .
८)निश्चित भरणा
मासिक भिशी किंवा खाजगी भिशीत नेमका शेवटपर्यंत किती भरणा करायचा आहे हे कधीही निश्चित नसते त्यामुळे भिशी घेणे त्यातील भांडवल वापरणे आपणास परवडणारे आहे किंवा नाही याचा कधीही अंदाज बांधता येत नाही. नेमकी काही भिशी घ्यावी यातील संभ्रमावस्था असते.या पासून आपणास मुक्ती मिळते ती दैनंदिन लिलाव भिशीतून.
९)निश्चित नफा
भिशी हे भांडवल आणि बचत दोन्ही मिळवून देणारे माध्यम आहे. ज्या सभासांचा प्रमुख उद्देश भिशीतून नफा मिळवणे आहे ते भिशीत सहभागी झाल्यापासून निश्चित राहू शकतात कि त्यांना मिळणारा नफा हा सुरवातीलाच जाहीर झालेला आहे म्हणून भिशी किती टक्क्याने विकली जाते याचे त्यांना लक्ष ठेवण्याची गरज राहत नाही.
१०)कमी कागदपत्रे
पैसे मिळवणे किंवा कर्ज घेणे या सारखी अवघड बाब या देशात कोणतीही नाही. कारण कर्ज घेण्यासाठी लागणारी कागद पत्रे हि एवढी किचकट पद्धती आहे कि लोक त्याचा धसका घेतात. त्यात कर्ज हे त्यालाच मिळते ज्याने हे सिद्ध केले कि माझ्याकडे पुरेपूर साधन आहे परतफेडीचे. त्यामुळे खरा गरजवंत हा बाजूला राहतो. म्हणून फक्त ७ कागद पत्राच्या आधारावर दैनंदिन भिशी भांडवल पुरवते आधार कार्ड किंवा पॅनकार्ड / दुकानचा परवाना, राहत्या घराचा पत्त्याचा पुरावा, भविष्यदेय निधी साठी ६ धनादेश, बँकेतील सहीचा नमुना, आणि मागील ६ महिन्यांचे खाते विवरण
११)सर्वाधिक परतावा
खरतर परतावा हा कोणत्याही गुंतवणुकीवर मिळत असतो परंतु भिशी या माध्यमात कोणतीही गुंतवणूक एकरकमी न करताहि चांगलं परतावा मिळतो. तोही विश्वास बसणार नाही एवढा. बँकेत मुदत ठेव म्हणून १ लाख रुपये आपण १३ महिन्यांसाठी भरले तर त्यावर परतावा मिळतो ७००० रुपय तोही १३महिन्यांनतर. म्हणजे १३ महिने आपण आपले एकरकमी लाख रुपये हे विसरून जायचे. सोन्यातील गुंतवणूक हि तशीच चोख सोने घेतले तरी सोन्याच्या भावातील उतार चढाव आपल्याला सोन्यातही फारशी परतावा देऊ शकत नाही.कोणतीही शाश्वती नाही. जमीनितील गुंतवणूक हि अनेक वर्ष थांबल्यानंतर मिळते. शेअर्स मधील नेहमीचा चढ उतार हि २० टक्क्यांपेक्षा अधिक परतावा देऊ शकला नाही. परंतुदैनंदिन भिशी एकरकमी भरणा न घेताही वार्षिक परतावा २२ टक्याने देते .
१२)मासीक भिशीचा पर्याय
याठिकाणी फक्त दैनंदिन भिशीला जर सभासद दैनंदिन भरणा करण्यास पात्र नसेल परंतु त्याला महिन्याला एकदा भरणा करता येत असेल अश्या सभासदांसाठी मासीक योजनाही असते.
१३)सरकारलाही उत्पन्न
आपण जेंव्हा सरकारकडून काही सोयी सुविधांची अपेक्षा करतो त्या पूर्ण करण्यासाठी लागणारा पैसा हा कर स्वरुपात मिळतो. आज खाजगी भिशीतून २५० लाख कोटी रुपयाच्या या भिशीतून किती मोठे नुकसान आपण देशाचे करत आहोत . याउलट सरकारमान्य भिशीतून सरकारला प्रती लिलाव, प्रती करारनामा, यातून उत्पन्न मिळतेच परंतु २०१५ पासून सेवा कर लागू झाला व सरकारलाही उत्पन्न मिळू लागले.
१४ )दैनंदिन लिलाव एकाच वेळी
सभासदांनादैनंदिन लिलावात सहभागी व्हायचे असेल तर त्यांना रोज आपले काम सोडून यावे लागेल. ते शक्य नाही म्हणून सभासदांची गैरसोय न होता त्यांना सोयीचे होण्यासाठी आठवड्यातून एकदा पुढील ६ दिवसांचे लिलाव एकावेळी घेतले जातात.त्यामुळे सभासदांना आधीच समजते कि कोणाला भिशी मिळली आहे व त्याला कागदपत्र गोळा करण्यास वेळ मिळतो. एकावेळी लिलाव केल्यामुळे सोमवार , मंगळवार ,बुधवार, या क्रमाने गृहीत धरला जातो .
१५)बचतीचा संस्कार जपतो
जे सभासद या दैनंदिन भिशीत तो प्रामुख्याने व्यापारी वर्ग आहे त्याला पहिल्यापासून रोज काहीना काही बचत दैनंदिन स्वरुपात मागे टाकण्याची सवय असते हि त्याची सवय त्याला भिशीतील भरणा अखंडित ठेवण्यासाठी मदत करते.
१६)हजारो समाधानी सभासद
१०२ वर्षांपासून सरकारमान्य लिलाव भिशी कार्य करत असल्याने करोडो समाधानी सभासद भारतभर आहे .इतक्या वर्षांचा हा इतिहास समाधानकारक आहे.
१७) इतर कोणत्याही कर्जापेक्षा कमी दर
कर्ज मिळणाऱ्या अनेक विविध साधनांपैकी कोणत्याही कर्जाशी भिशीतून मिळालेल्या पैशांशी तुलना केल्यास व्याजाचा दर निश्चितच कमी असेल भिशिच्या भांडवलाचा .
१८) झिरो टक्क्याने पैसे वापरायला देणारी एकमेव संस्था
कुणी आजच्या जगात कुणा अनोळखी सोडा ओळखीच्या माणसाला तरी बिना व्याज पैसे वापरायला देईल का? नाही ना परंतु आता हे शक्य आहे दैनंदिन लिलाव भिशीत. कारण एका ठराविक कालवधीत भिशी घेतल्यास सभासदाला त्याने घेतलेली रक्कम हि बिनव्याजी वापरावयास मिळते एवढेच नाही तर व्याजही मिळते . असे जगात घडणारी एकमेव संस्था म्हणजे लिलाव भिशी.
१९)व्याजाचा दर ठरवायचा अधिकार सभासदाकडे
जगात कोणीही व्यक्ती दुसर्याकडे कर्ज रूपाने पैसे मागण्यासाठी जाते तेव्हा त्या कर्जाचा व्याजदर हा देणाऱ्याकडून ठरवला जातो. परंतु दैनंदिन लिलाव भिशीने हि परंपरा खोडून सभासदांना त्यांना घ्यावयाच्या रकमेच्या व्याजाचा दर सभासदानेच ठरविण्याची मुभा बहाल केली आहे.हे एक जागतिक आश्चर्य आहे.
२०)भांडवल +बचत+कायदेशीर भिशीचे एकत्रीकरण
भांडवलासाठी आणि बचतीसाठी बेकायदा भिशीतून भांडवल मिळवणे आता यानंतर गरजेचे राहणार नाही. दैनंदिन लिलाव भिशीमुळे या तिन्ही बाबी एकाच ठिकाणी मिळणार आहेत.
२१)कर्जाची रक्कम ठरविण्याचा अधिकार सभासदाकडे
सभासदाला स्वतःला किती रक्कम हवी आहे हे स्वतः ठरवता येणार आहे. इतर बँका प्रमाणे सभासदाची कागदपत्रे पाहून नंतर कर्ज येथे ठरविले जात नाही
२२)सभासद आकर्षित होण्याची महत्वाची कारणे
अ)गुंतवणूक नाही त्यामुळे भीती नाही.
ब) दुसऱ्या दिवसापासून दररोज मोठी रक्कम मिळणार.
क)कॅशलेस सुविधा
ड)पैसे भरण्याचा पर्याय दैनंदिन म्हणून जास्त भार नाही .
इ)सुरक्षितता आणि कायदेशीर संरक्षण
फ)गुंतवणूक न करताही परतावा
ग)घरपोहोच सेवा.
© 2020 Jijau Kuries Washim. All Rights Reserved | Design by Flyct Softtech